
कर्जत | तालुका प्रतिनिधी | Karjat
सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नसल्याने शेती अधिकाधिक तोट्यात चालल्याने
कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश शेळके यांनी आपल्या शेतात मोठ्या कष्टातून फुलविलेली लिंबोणी फळबाग जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. लिंबाला चांगला दर मिळत नसल्याने वैतागून त्यांनी हा निर्णय घेतला. शासनाचा तीव्र शब्दात निषेध करून दोन जेसीबीच्या सहाय्याने त्यांनी ही फळबाग उध्वस्त केली.
गेल्या सहा महिन्यांपासून लिंबाला दोन ते पाच रुपये एवढा भाव मिळत होता. लाखो रुपयांची गुंतवणूक करून मोठ्या कष्टातून फुलवलेली फळबागेची शेती तोट्यात चालली होती. आलेल्या उत्पादनातून मजुरांचा खर्च देखील निघत नव्हता.