यंदाचा दसरा व्यापार्‍यांसाठी आशावादी !

फुलांचा बाजार सजला || सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन व घरांची विक्री वधारण्याची अपेक्षा
यंदाचा दसरा व्यापार्‍यांसाठी आशावादी !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नवरात्रातील (Navratra) बाजारपेठेतील (Market) एकूण उठाव अपेक्षेनुसार ठरला नाही. मात्र दसर्‍याचा सण (Dussehra Festival) गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक हसरा ठरेल, अशी शक्यता आहे. सोने-चांदीला ग्राहकांची मागणी (Consumer Demand for Gold-Silver) उत्तम आहे. त्यासोबत कापडबाजार (Textile Market), इलेक्ट्रॉनिक्स (Electronics), वाहन विक्री (Vehicle Sales) आणि घरबांधणी व्यवसायात (Housing Business) दसर्‍याच्या मुहूर्तावर मागणी वाढण्याची शक्यता आहे. करोना संकटामुळे अनेक महिने लॉकडाऊनला सामोरे जावे लागल्याने बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. सरकारने लॉकडाऊन (Lockdown) हटविल्यानंतर बाजार पूर्ववत होण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र ग्राहकांच्या हाती पैसा माफक असल्याने अद्यापही बाजारपेठेला उठावाची प्रतीक्षा आहे.

मात्र सणांच्या काळात बाजारात (Market) चैतन्य संचारेल या अपेक्षेने पुन्हा एकदा बाजारपेठा सजल्या आहे. नवरात्रासोबत बाजारातील उलाढाल वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र सराफा (Saraf) वगळता अन्य व्यवसाय अद्यापही अडचणींचा सामना करत आहेत. घरबांधणीच्या नव्या प्रकल्पांची संख्या यंदाही कमी आहे.

ऑनलाईन मार्केटचा (Online Market) स्थानिक इलेक्ट्रॉनिक्स मार्केटवर मोठा परिणाम झाला आहे. मोबाईल, कॅम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेट यासह टिव्ही, एसी, फ्रिज, वॉशिंग मशिन आदी वस्तू थेट ऑनलाईन मागविण्याकडे ग्राहकांचा ओढा असल्याने स्थानिक विक्रेत्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या वस्तूंवर ऑनलाईन मार्केटमध्ये मिळणार्‍या ऑफर्सचा सामना कसा करावा, असा प्रश्न विक्रेत्यांसमोर आहे.

फुलांचा बाजार सजला

दसर्‍याच्या मुहूर्तासाठी फुलबाजार सजला होता. शहरातील अनेक चौकांमध्ये फुले विक्रीसाठी आली आहेत. यंदा फुलांचे दर स्थिर आहेत. मध्यंतरी वादळ आणि अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी फुलशेतीला फटका बसला. त्यामुळे यंदा बाजारात फुलांची आवकेवर परिणाम झाला. मात्र अद्याप ग्राहकांचा अपेक्षीत प्रतिसाद नसल्याने दर स्थिर असल्याचे दिसून आले. शुक्रवारी सकाळी फुलांच्या दर वधारतील, असे विक्रेत्यांनी सांगीतले. किरकोळ बाजारात सध्या झेंडू 100 ते 110, शेवंती 80 ते 90, अष्टर 80 ते 100 प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.

Related Stories

No stories found.