संजयनगर नामांतराच्या विरोधासाठी पालिकेवर मोर्चा

संजयनगर नामांतराच्या विरोधासाठी पालिकेवर मोर्चा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील संजयनगर (Sanjaynagar), ईदगाह मैदान परिसर (Eidgah Grounds), रामनगर (Ramnagar), गोपिनाथनगर (Gopinathnagar), मिल्लतनगर (millatnagar) या परिसराचे नामांतर करण्यास नागरिकांचा विरोध वाढत असून त्याचाच भाग म्हणून काल या परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा (municipality Movement)आणून नामांतर करू नये, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा (Hint) दिला. याबाबतचे निवेदन आंदोलकांनी नगरपालिकेला दिले.

या परिसरास गोविंदनगर (govindnagar) असे नाव देण्यात यावे, असा ठराव नगरपालिकेने दि. 30 मार्च 2021 रोजी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्र. 96/2 अन्वये मंजूर केलेला आहे. सदर ठराव नुकताच जनतेसमोर आल्याने नागरिकांमधून त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. या ठरावास विरोध दर्शवित संविधान बचाव समितीच्यावतीने मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. त्यांतर काल पुन्हा या भागातील नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा नेवून नामांतरास विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत असे नामांतर करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन (Movement) केले जाईल, असा इशारा (Hint) यावेळी देण्यात आला.

सदरचा ठराव रद्द करून या परिसराला संजयनगर, ईदगाह मैदान परिसर या नावानेच ओळखण्यात यावे, या परिसरातील राहणार्‍या सर्वसामान्य नागरिकांच्या लोकभावनेचा गांभिर्याने विचार करावा, या मागणीचे निवेदन नगरपालिकेला देण्यात आले.

दरम्यान, या ठरावाचे अनुमोदक असलेल्या नगरसेवक राजेंद्र पवार (Corporators Rajendra Pawar) यांनी नागरिकांचा रोष पाहून ‘यू टर्न’ घेतला आहे. नगरपालिकेकडून या भागात नवीन प्रकल्प सुरू केला जाणार असून याठिकाणी बगीचा व मंडई करण्यात येणार असून त्या परिसराला गोविंदनगर असे नाव देण्याचे ठरले आहे. त्यामुळे या कुठल्याही भागाचे नाव बदलले जाणार नाही, असा खुलासा करत श्री. पवार म्हणाले, या भागातून काही जणांना नगरसेवक होण्याचे स्वप्न पडू लागले आहेत. त्यामुळे ते अशा अफवा पसरवित आहेत. या राजकारणाला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

संजयनगर, गोपीनाथ नगर, रामनगर, मिल्लत नगर, ईदगाह परिसर या परिसराचे नाव बदलून गोविंदनगर करण्याचा अट्टाहास घातलेल्या गोष्टीला विरोध करण्यासाठी व वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी श्री शक्ती ग्रुपच्या अध्यक्षा दीपाली ससाणे यांनी या परिसरातील नागरिकांशी भेटून चर्चा केली व वस्तुस्थिती जाणून घेतली. काही झाले तरी या परिसराचे नाव बदलण्यात येणार नाही. यासाठी मोठा लढा उभारावा लागला तरी चालेल आम्ही या परिसरातील नागरिकांच्या सोबत आहोत, असे दिपाली ससाणे म्हणाल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com