नालेगाव, नेप्ती, निंबळक भागातील शेतकर्‍यांचा रेल्वे रुंदीकरणाला विरोध

नालेगाव, नेप्ती, निंबळक भागातील शेतकर्‍यांचा रेल्वे रुंदीकरणाला विरोध
रेल्वे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नालेगाव, नेप्ती, निंबळक शिवारातील दौंड-मनमाड रेल्वे दुहेरी करण्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी जात असल्याने शेतकर्‍यांना कोणताही मोबदला मिळालेला नाही. शेतकर्‍यांच्या जमिनींना योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी या भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत निवेदन देण्यात आले असून यावेळी दत्ता वामन, सुनील चितळे, राजू म्हस्के, अरुण म्हस्के, रवींद्र कवडे, संतोष लांडे, बापू कवडे, देविदास रोहकले आदी शेतकरी उपस्थित होते.

दौंड-मनमाड रेल्वे दुहेरी करण्यासाठी नालेगाव, नेप्ती, निंबळक येथील शेतकर्‍यांच्या जमिनीतून पूर्वी रेल्वे रूळापासून 13 मीटर अंतर सोडून रेल्वेने मोठे पोल लावलेले आहेत. त्यातच आता चालू पिकामध्ये जमिनीमध्ये 13 मीटर सोडून 26 मीटर ते 30 मीटर शेतकर्‍यांच्या ताब्यात असलेल्या शेतीमध्ये अंतर वाढवून पोल लावण्यात येत आहेत. रेल्वेच्या या रुंदीकरणाला या गावातील शेतकर्‍यांची हरकत असून जेवढ्या आमच्या जमिनी जाणार आहेत, त्याप्रमाणात रेल्वेकडून मोबदला मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.