इंधन दरवाढ विरोधात युवासेनेचा सायकल रॅलीद्वारे निषेध

इंधन दरवाढ विरोधात युवासेनेचा सायकल रॅलीद्वारे निषेध

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

इंधन दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली असुू दिवाळीच्या सणात महागाईचा भडका उडाला आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात युवा सेनेच्यावतीने कोपरगाव शहरातील युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढत तीव्र निषेध नोंदविला.

शिवसेना नेते युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सचिव सुरज चव्हाण, युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई,सहसचिव विस्तारक शिर्डी लोकसभा सुनील तिवारी, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना एस.टी. कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल म्हणाले, इंधन दरवाढ ही 1947 पासून आज पर्यंतची सर्वात जास्त दरवाढ आहे. हि दरवाढ वर्ल्ड रेकॉर्ड झाली आहे. शेतकरी बांधवांनाही यांचा मोठा फटका बसला आहे. शेतकरी बांधव ट्रक्टरने शेती करायची सोडून पारंपारिक पद्धतीने शेती करत आहे. त्यामुळे शेतीचे उत्पादन घटत आहे. अशी वाईट परिस्थिती शेतकरी बांधवांवर आली आहे.

सुनील तिवारी म्हणाले, इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेच्यावतीने एकाचवेळी आज महाराष्ट्रात सायकल रॅलीच्या माध्यमातून आंदोलन चालू असून हा गरिब जनतेचा आक्रोश आहे. हाच जन आक्रोश शासनापर्यंत पोहचवत असून महागाई कमी करावी अशी सद्बुध्दी केंद्र शासनाला मिळो. या सायकल रॅलीमध्ये युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या रॅलीला उपस्थित तरुणांचे विक्रांत झावरे यांनी आभार मानून रॅली संपन्न झाली. याप्रसंगी केंद्र शासनाच्या महागाईच्या विरोधात तरुणांनी निषेध नोंदवला आहे. रॅलीसाठी विशाल झावरे, वाहतूकसेनेचे जिल्हाप्रमुख इरफान शेख, उपशहरप्रमुख विकास शर्मा, भुषण पाटणकर, गोपाळ वैरागळ, संघटक बाळासाहेब साळुंके, सह संघटक वैभव गिते, समन्वयक योगेश उशीर,विभागप्रमुख मयुर दळवी, दिपक बरदे, विजय शिंदे, निशांत झावरे, भूषण वडांगळे, मधू पवार,ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे, सतीश शिंगाणे, प्रविण देशमुख, वाहतूक सेनेचे अविनाश धोक्रट, पप्पू पेकले, पंकज शिंदे, गणेश थोरात, निखिल मडवई, उमेश छुगाणी, गोविंद चव्हाण, मंगेश देशमुख, वैभव हलवाई, वसिम शेख, संदीप पाटील, आकाश हलवाई, सुशील धाडीवाल, अभिजीत दरुंटे, संकेत फडे, सिद्धार्थ पांडे, शुभम अनर्थे, कार्तिक बागुल, हरीश जोशी, अक्षय खडांगळे, वेदांत कर्पे, रविंद्र पवार, प्रणित गंडे, राज जाधव, जाफर पठाण, दत्तात्रय सालकर, दत्तात्रय गिते, रुपेश सालकर, शुभम वाघमारे, पवन वाघ, ओम साळुंके, रेहान शेख याच्यासह युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com