मुख्यमंत्री महाआरोग्य योजनेअंतर्गत बेरोजगारांना मोफत कौशल्य प्रशिक्षणाची संधी

मुख्यमंत्री महाआरोग्य योजनेअंतर्गत बेरोजगारांना मोफत कौशल्य प्रशिक्षणाची संधी

अहमदनगर (प्रतिनिधी) - कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकिय क्षेत्रामध्ये प्रशिक्षित व कुशल मनुष्य बळाची कमतरता जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील बेरोजगार युवक/युवतींना विविध कोर्सेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करु इच्छिणार्‍या उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केले आहे.

Ambulance Driver, Assistant Duty Manager - Patient Relation Services, Central Sterile Service Department (CSSD) Assistant, Dresser (Medical), Duty Manager (Patient Relation Services), Elderly Caretaker (Non-Clinical),

Emergency Medical Technician - Basic, Healthcare Quality Assurance Manager, Hospital Front Desk Coordinator, Medical Records and Health Information Technician, Medical Records Assistant, Patient Relations Associate, Phlebotomist, Pradhan Mantri Arogya Mitra, Sanitary Health Aide

अ‍ॅम्ब्युलंस ड्रायव्हर, असिस्टंट ड्युटी मॅनेजर, पेशंट रिलेशन सर्व्हिसेस, सेंट्रल स्टेरियल सर्व्हिस डिपार्टमेंट (सीएसएसडी) असिस्टंट, असिस्टंट, ड्रेसर (मेडिकल), ड्युटी मॅनेजर (पेशंट रिलेशन सर्व्हिसेस), एल्डर्ली केअर टेकर (नॉन क्लिनीकल),

इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन-बेसिक, हेल्थकेअर क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स मॅनेजर, हॉस्पिटल फ्रंट डेस्क को-ऑर्डिनेटर, मेडिकल रेकॉर्डस अ‍ॅण्ड हेल्थ इन्फॉर्मेशन टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्डस असिस्टंट, पेशंट रिलेशन्स असोसिएट, फ्लेबोटोमिस्ट, प्रधानमंत्री आरोग्य मित्र, सॅनिटरी हेल्थ एड इत्यादी कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यांकडून कोणतेही प्रशिक्षण शुल्क आकारण्यात येणार नाही. या कोर्सेस करीता वयोमर्यादा 18 ते 45 इतकी आहे.

सदरचे प्रशिक्षण घेऊ इच्छिणार्‍या उमेद्वारांनी शैक्षणिक पात्रता व अधिक माहिती खालील गुगल फॉर्म लिंक वर भरुन पाठवावी.

माहिती भरण्यासाठी गुगल लिंक - https://forms.gle/Z87Hp2XwS4NSTSS97

याबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या 0241-2425566 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य केंद्राचे सहायक आयुक्त वि. जा. मुकणे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री महाआरोग्य योजनेअंतर्गत बेरोजगारांना मोफत कौशल्य प्रशिक्षणाची संधी
सावधान ! सैन्यात नोकरीच्या आमिषाने तरुणांना 60 लाखांना गंडा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com