श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

ऑपरेशन मुस्कान दरम्यान श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 10 लहान मुलांचे अपहरणांचे गुन्हे दाखल असून

त्यापैकी 4 वालकांचा शोध घेण्यात आला आहे. त्याचवरोबर एकुण 137 मोठ्या व्यक्ती हरवलेल्या होत्या त्यापैकी 81 व्यक्तीचा शोध घेतलेला आहे. 78 महिलांपैकी 52 तर 59 पुरुषापैकी 29 असा एकुण 85 वालके, महीला, पुरुष यांचा शोध घेतलेला आहे.

दि. 01 डिसेंबर 2020 ते दि. 31 डिसेंबर 2020 दरम्यान ऑपरेशन मुस्कान संपुर्ण महाराष्ट्रभर राबविण्यातबाबत तसेच महिला व बालके यांचा शोध घेण्याचे आदेश झाले होते.

त्या अनुषंगाने संपुर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये हरवलेल्या महिला पुरुष तसेच अपनयन व अपहरण केलेली बालके यांचे शोधकामी विशेष मोहीम रावविण्यातत आली आहे. सदर यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे श्रीरामपुर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएस पोलीस अधिकारी आयुष सोपाणी, पोसई, समाधान सुरवाडे, पोलीस नाइक, संजय दुधाडे, पोना दत्तात्रय दिघे, महिला पोलीस कॉन्स्टेबल राधा टोपे, पोलीस कॉन्स्टेबल ॅ गणेश ठोकळ, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बारसे यांनी केली आहे.