रेमडिसिव्हीर, ऑक्सीजनसाठी 24X7 कंट्रोल रूम, करा या क्रमांकावर फोन

रेमडिसिव्हीर, ऑक्सीजनसाठी 24X7 कंट्रोल रूम, करा या क्रमांकावर फोन

अहमदनगर | Ahmednagar

जिल्हयामध्ये करोना बाधीत रुग्णांना रेमडेसीविर इंजेक्शन आणि ऑक्सीजन पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने करोना बाधीत रुग्ण व नातेवाईक यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण

करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे 24 x 7 कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) कार्यान्वित करण्यात आली आहे.

या कंट्रोल रुमचा दूरध्वनी क्रमांक 0241-2322432 आहे. या कंट्रोल रुमसाठी नोडल अधिकारी म्हणून सहायक पुरवठा अधिकारी किशोर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक अधिकारी म्हणून श्री. कातकडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर हे आहेत.

नागरीकांनी जिल्हयातील करोना बाधीत रुग्णांना रेमडेसीविर इंजेक्शन आणि ऑक्सीजन पुरवठा सुरळीत मिळणेकरीता या कंट्रोल रुमशी संपर्क साधावा. ही कंट्रोल रुम 24X7 सुरु राहील, असे निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांनी कळविले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com