नगरच्या वॉईन शॉपमधून खुलेआम दारू विक्री

नगरच्या वॉईन शॉपमधून खुलेआम दारू विक्री

उत्पादन शुल्कचा छुपा आशीर्वाद : मनपा, पोलिसांचे दुर्लक्ष

अहमदनगर (प्रतिनिधी) - महापालिकेने दोन दिवस मोकळीक दिल्यानंतर पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहे. यामुळे शहरातील सर्व आस्थापनासह भाजीपाला, किराणा दुकाने बंद ठेवण्यात आले आहे.

नियमांचे उल्लंघन करून काही ठिकाणी भाजी विक्री, किराणा दुकान सुरू असणार्‍यांवर मनपा व पोलीस पथकांकडून कारवाई केली जात आहे. परंतु, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने व मनपा, पोलिसांनी जाणूनबुजून केलेल्या दुर्लक्षामुळे शहरात दारूची दुकाने खुलीआम सुरू आहे. दुकानाच्या बाहेर मद्यपींची गर्दी दिसत असतानाही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.

जिल्ह्यासह शहरात करोना रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने कडक निर्बंध लागू केले आहे. रूग्ण संख्या कमी होत असली तरी नागरिकांची गर्दी कमी होत नाही. नियमांचे उल्लंघन होत आहे. यामुळे मनपा प्रशासनाने 1 जूनपर्यंत निर्बंध अधिक कडक केले आहे. निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मनपासह पोलिसांचे पथक कार्यरत आहे.

याकाळात भाजीपाला, किराणा विक्रेत्यांना बंद घालण्यात आली असल्याने त्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहे. त्यांचे मोठे नुकसान होत आहे. दुकाने सुरू केल्यास प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र शहरातील वॉईन शॉप, हॉटेल, सरकारमान्य दारूंची दुकानातून दारू विक्री सुरू आहे.

पुढील बाजू बंद करून, दुकानाच्या बाहेर ठरावीक कामगार उभे करून मद्यपींना दारू दिली जात आहे. दारू खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. या दारूंच्या दुकांनावर मात्र कोणीच कारवाई करताना दिसत नाही. यामुळे भाजीपाला, किराणा व्यवसायिकांमध्ये नाराजीचा सुरू आहे.

शहरातील वॉईन शॉप सुरू असून भाजीपाला विक्री बंद असल्याचे लक्षात आले आहे. शेतकर्‍यांना भाजीपाला विक्री करण्यास बंदने घालण्यात आली असून हे अन्यायकारक आहे. शेतीमाल विक्रीला बंदी व दारू विक्रीला परवानगी दिल्याचे चित्र मनपा हद्दीत दिसून येत आहे. यामुळे 22 मे रोजी मनपा आयुक्तांच्या निवास्थानी लाक्षणिक उपोषण करणार आहे.

- कॉ. भैरवनाथ वाकळे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com