ऑनलाईन बैठकांबाबत शासनाकडून निर्देश जारी

सामान्य प्रशासन विभागाने दिले आदेश
ऑनलाईन बैठकांबाबत शासनाकडून निर्देश जारी

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

कोविङ-१९ संसर्गाच्या (covid19 infection) पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांतील प्रवेश (Admission to government offices) नियंत्रित (Contol) करण्यात आलेला आहे. प्रत्यक्ष बैठका न घेता सद्यस्थितीत त्या ऑनलाईन (Online Meeting) पद्धतीने आयोजित करण्यात येत असून सदर बैठका आयोजित करण्याबाबतच्या कार्यपद्धती संदर्भाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने स्वतंत्र निर्देश (Notice from Administration Department) दिले आहेत.

शासकीय कार्यालयांमध्ये (Government Office) ऑनलाईन पद्धतीने बैठका (Online Meeting) आयोजित करताना बैठकीची निश्चित तारीख व वेळ उपस्थित राहाणाऱ्या संबंधितांना बैठकी अगोदर पूर्वतयारी करता येईल अशा बेताने ई-मेलद्वारे (E-Mail) पाठविण्यात यावी. यासाठी आवश्यक लिंक (Link) बैठकी अगोदर किती काळ पाठविणार असल्याबाबत त्यांना अवगत करण्यात यावे. बैठकीचे स्वरुपाप्रमाणे ऑनलाईन बैठकीसाठी उपलब्ध व सुयोग्य अशी संपर्कप्रणाली वापरण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत बैठकीची लिंक बैठकीशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना अवगत करु नये. बैठकी दरम्यान इंटरनेटचा वेग (internet Speed) पुरेसा राहील याची खात्री करावी.

बैठकीसाठी किमान ५ मिनिटे अगोदर उपस्थित राहावे. बैठक कक्षातील उपस्थित व्यक्तीचा चेहरा व्यवस्थित दिसेल अशा रितीने कॅमेरा (Camera) लावण्यात यावा. तसेच कक्षामध्ये पुरेसा उजेड राहील याची दक्षता घ्यावी. उपस्थितांनी बैठकीत ते स्वतः बोलत नसताना ध्वनीविस्तारक मूक राहील (Mike) मात्र कॅमेरा सुरु राहील याची दक्षता घ्यावी. बैठकी दरम्यान बैठकीमधील चर्चेकडे पूर्ण गांभीर्याने लक्ष देणे अभिप्रेत आहे. त्यावेळी इतरांचे लक्ष वेधणारी कुठलीही कृती टाळावी तसेच उपस्थितांच्या मागे ये जा होणार नाही याची दक्षता घ्यावी.बैठकी दरम्यान भ्रमणध्वनी वापरावयाचा (Mobile Use) असल्यास बैठक कक्षाच्या बाहेर जावे. ऑनलाईन सादरीकरण करावयाचे असल्यास त्याप्रमाणे अगोदर अवगत करावे, सादरीकरण कमीत कमी शब्दांसह असावे. बैठकीतील माहितीचे विनापरवाना चित्रण, ध्वनीमुद्रण अथवा प्रक्षेपण करण्यात येवू नये.

ऑनलाईन बैठकीना शक्यतो कार्यालयातील लॅपटॉप संगणकाचे (laptop Computer) माध्यमातून उपस्थित राहावे. अपरिहार्य परिस्थितीत वैयक्तिक भ्रमणध्वनीद्वारे उपस्थित राहाता येईल. बैठकी दरम्यान प्रत्यक्ष बैठकीचे आवश्यक आचार पाळण्यात यावेत. तसेच बैठकीसाठी पोशाख शालीन असावा. बैठकीत अध्यक्षांच्या परवानगीने इतर उपस्थितांनी आपल्या क्रमाप्रमाणे बैठकीत आपले म्हणणे मांडावे. उपस्थितांपैकी एखादी व्यक्ती आपले मत मांडत असताना त्यांचे म्हणणे पूर्ण झाल्यानंतर संपर्क प्रणालीत उपलब्ध असलेल्या "हात वर" या सुविधेचा वापर करून परवानगी घ्यावी . त्यानंतर आपले मत मांडावे. बैठक संपल्याचे जाहिर झाल्यानंतरच संपर्क प्रणाली बंद करण्यात यावी.

सर्व मंत्रालयीन विभाग (Ministry Department) तसेच मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील सर्व विभागांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. असेही आदेश (Order) परिपत्रकात देण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com