ऑनलाईन लॉटरी, बिंगो गुन्ह्यात वाढीव कलमे

crime news
crime news

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरामध्ये सुरू असलेल्या बेकायदा व विनापरवाना ऑनलाईन लॉटरी सट्टा चालक व मालकावर तसेच बिंगो केंद्रावर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या पथकाने कारवाई केली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्ह्यात भादंवि 174, 177, 181, 182, 188 तसेच 419 वाढीव कलम लावण्यात आले आहे.

विशेष पथकाने केलेल्या कारवाई प्रकरणी ज्ञानेश्वर वसंतराव तनपुरे, राकेश बालराज गुंडू, निलेश कृष्णा लोखंडे, आनंद लोढा, पंडित पोकळे, शाम बाळू अडागळे, विजय लक्ष्मण शिंदे, विकास दिलीप भिंगारदिवे, यासीन रजक शेख, अशोक दामोदर कावळे, रामभाऊ सदाशिव घुले, प्रवीण अनिल टेकाळे, बाबा महबूब शेख, प्रकाश बबन गायकवाड, महेंद्र माखीजा, कैलास जावळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सहायक पोलीस निरीक्षक संदीप जाधव, अंमलदार शकील अहमद शेख, सचिन धारणकर, प्रमोद मंडलिक, कुणाल मराठे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com