बेलापूर व उक्कलगाव केंद्रात राबतोय उत्कृष्ट ऑनलाईन उपक्रम

बेलापूर व उक्कलगाव केंद्रात राबतोय उत्कृष्ट ऑनलाईन उपक्रम

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

बेलापूरचे केंद्र प्रमुख यु. के. शेलार यांनी बेलापूर व उक्कलगाव केंद्रातील शाळांसाठीसाठी दर शनिवारी Google Meet वेबिनारद्वारे Study From Home Online शिक्षण याद्वारे शिक्षकांची Online कार्यशाळा घेऊन, खर्‍याअर्थाने दोन्ही केंद्रातील Online शिक्षणाला चालना दिली आहे.

मागील आठवड्यात दोन्ही केंद्रांतील सर्व माध्यमाच्या मुख्याध्यापकांची Online कार्यशाळा पुष्प पहिले घेतले. त्याद्वारे दोन्ही केंद्रातील विद्यार्थी शिक्षणाला गती मिळाली आहे. या आठवड्यात दोन्ही केंद्रातील जिल्हा परिषद मुख्याध्यापक व शिक्षकांची Online कार्यशाळा पुष्प दुसरे घेतले. त्या मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी श्री.संजीवन दिवे यांनी मार्गदर्शन करताना ,शिक्षकांनी विविध Online उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रभावी अध्यापन करावे. तसेच भोंगा शाळा संकल्पना राबवावी.असे त्यांनी म्हटले.

बेलापूरचे केंद्र प्रमुख यु.के. शेलार यांनी मार्गदर्शन करताना, शिक्षकांनी तंत्रस्नेही बनून, आधुनिक शिक्षण प्रक्रिया आत्मसात करून उद्भवलेल्या परीस्थितीत मार्ग काढला पाहिजे, असे प्रतिपादन केले.सदर कार्यशाळेस पंचायत समिती विषयतज्ञ राजू कदम यांनी PPT द्वारे छान सादरीकरण करून Study From Home Online शिक्षणाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेस सर्व शिक्षकांनी विविध शैक्षणिक बाबींवर सखोल चर्चा केली. यामध्ये शिक्षक अनिल ओहोळ,श्री. सूर्यभान वडितके, श्री. इमाम व सर्वच शिक्षकांनी आपआपले विचार व्यक्त केले. सदर सभेमध्ये दर आठवड्याच्या Google Meet वेबिनारद्वारे प्रत्येक शनिवारी दोन्ही केंद्रांतील दोन शाळांनी आपण राबवत असलेल्या उपक्रमाची PPT सादरीकरण करायचे ठरले.यास सर्वांनी मान्यता दिली.

तसेच Google Meet वेबिनार सभेचे आयोजन तंत्रस्नेही शिक्षक राजेंद्र पंडित यांनी केले. आभार श्री. लोंढे यांनी मानले. कार्यशाळा चर्चात्मक उत्कृष्टपणे पार पडली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com