कांदा व्यापार्‍याला दीड कोटीचा गंडा

तोफखाना ठाण्यात चार परप्रातीयांवर गुन्हा
कांदा व्यापार्‍याला दीड कोटीचा गंडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील कांदा व्यापार्‍याला ( Onion Traders) परराज्यातील चौघांनी दीड कोटी रूपयांचा गंडा (Fraud) घातला. फसवणूक (Fraud) झालेले व्यापारी गणेश मुरलीधर तवले (रा. तवलेनगर, औरंगाबाद रोड, नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

प्रसाद के., स्टीफन प्रवीणकुमार, सुजय बेलूर, मांतेश पाटील (चौघे रा. बंगळुरू, कर्नाटक) असे गुन्हा दाखल (Filed a Crime) झालेल्यांची नावे आहेत. व्यापारी तवले शेतकर्‍यांकडून कांदा खरेदीकरून परराज्यातील व्यापार्‍यांना (Traders) पाठवितात. तवले यांची कर्नाटकच्या तस्करबेरी अ‍ॅग्री व्हेंचर (Smugglerberry Agri Venture) या कंपनीच्या चार जणांशी ओळख झाली. त्यातील दोघे तवले यांना त्यांच्या कार्यालयात भेटले. त्यांनी तवले यांना कर्नाटकमध्ये (Karnatak) बोलावले. त्यानंतर तवले हे त्यांचे व्यवहार पाहणारे नितीन पवार यांच्यासह सदर कंपनीच्या बंगळुरू येथील कार्यालयात गेले.

तेथे त्यांच्यात व्यवसायाची बोलणी झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा सात कोटी सात लाख 29 हजार 686 रूपयांचा माल त्यांनी ठरल्याप्रमाणे त्या कंपनीला वेळोवेळी पाठविला. कंपनीकडून पाच कोटी 53 लाख 83 हजार 551 रूपये हे तवले यांना त्यांच्या गणेश ट्रेडिंग फर्मच्या खात्यावर पाठविले गेले. उर्वरित एक कोटी 50 लाख 46 हजार 135 रूपये मिळावी, याकरिता त्यांनी त्यांच्याशी सातत्याने संपर्क केला. तीन वेळा बंगळुरू येथेही जाऊन आले. शेवटी व्यापारी तवले यांनी तोफखान्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com