तांदुळवाडीत कांदाचोर रंगेहात पकडला, मात्र पसार झाला

तांदुळवाडीत कांदाचोर रंगेहात पकडला, मात्र पसार झाला

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील तांदुळनेर येथे एका भामट्याला कांदे चोरताना रंगेहाथ पकडले. मात्र, संधीचा फायदा घेऊन तो चोर घटनास्थळावरून पसार झाला. याबाबत राहुरी पोलिसांत कार्तिक घरे याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश गंगाधर साबळे, वय 35 वर्षे, रा. तांदुळनेर ता. राहुरी यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 29 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास तांदुळनेर येथील शेती गटनंबर 129 येथे आरोपी कार्तिक घरे याने फिर्यादी गणेश साबळे यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्याकरीता कांदा चोरून नेत होता. गणेश साबळे हे अचानक शेतात गेले. त्यांना पाहून आरोपी कार्तिक घरे हा पळून गेला.

साबळे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी कार्तिक अण्णासाहेब घरे, रा. तांदुळनेर ता. राहुरी याच्या विरोधात गुन्हा रजि. नंबर 362/2022 भादंवि. कलम 379, 511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक एस. बी. निकम हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.