कांदा चाळींसाठी 62 कोटींचे अनुदान

कांदा चाळींसाठी 62 कोटींचे अनुदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. कांदा चाळ उभारणीसाठी राज्य सरकारने 62.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण रू. 250 कोटींचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरुपात 62.50 कोटी रुपयांचा निधी एका वर्षाच्या कालावधीसाठी मंजूर करण्यात आला आहे.

कांदाचाळ उभारणी प्रकल्प सन 2021-22 व 2022-23 मध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर प्रकल्पांतर्गत एकूण 250.00 कोटी रुपयांचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरूपात रू. 125 कोटी निधी दोन वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीने सन 2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 125 कोटी नियतवाटप मंजूर केलेले आहे.

आता सदर प्रकल्प सन 2022-23 मध्ये राबविण्यासाठी उर्वरित62.50 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. सदर प्रकल्प 50:50 या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांनाएकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मापदंडानुसार अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी रू.62.50 कोटी निधी राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com