कांदा बियाणे निघाले बोगस

कांदा बियाणे निघाले बोगस

अहमदनगर |प्रतिनधी| Ahmednagar

कांदा बियाणे बोगस निघाल्याने नगर तालुक्यातील विळद येथील शेतकरी श्रीकांत अडसुरे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हे बियाणे जेएससी सीडस या कंपनीचे असून कंपनीच्या अधिकार्‍याकडून उडवाउडवीचे उत्तरे दिले जात असल्याची माहिती शेतकरी श्रीकांत अडसुरे यांनी दिली आहे. नूकसान भरपाई मिळावी तसेच संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

शेतकरी अडसुरे यांनी 29 आक्टोबर 2020 रोजी अहमदनगरमधील एका बियाणे विक्री करणार्‍या केंद्रातून उन्हाळी कांदा बियाणे खरेदी केले. 7 जानेवारी 2021 रोजी दीड एकरमध्ये लागवड केली. मात्र लागवड केल्याच्या 60 ते 70 दिवसानंतर कांद्यात डेंगळ्यांचे प्रमाण 55 टक्के असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अडसुरे यांचे आर्थिक नूकसान झाले आहे. ही बाब अडसुरे यांनी जेएससी सीडस या कंपनीचे पुरवठा अधिकारी गोपाल अग्रवाल यांना दिली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली.

अडसुरे यांनी ही बाब कृषी विभागाला कळवली. त्यानूसार 9 एप्रिल 2021 रोजी कृषी अधिकार्‍यांनी पंचनामा केला आणि 45 ते 55 टक्के डेंगळ्याचे प्रमाण असल्याचा उल्लेख पंचनाम्यात केला आहे. तात्काळ नुकसान भरपाई द्यावी तसेच बोगस बियाणे विकणार्‍या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी श्रीकांत अडसुरे यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com