टाकळीभानला कांदा २७०० रुपये

टाकळीभानला कांदा २७०० रुपये

टाकळीभान (वार्ताहर)-

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात कांद्याने चांगलाच भाव खाल्ला. गेल्या बाजारपेक्षा कांद्याचे दर ७०० ते ८०० रुपयांनी वधारले आहेत.

येथे १ नंबर कांद्याला २७०० रुपयांचा दर मिळाला. काल शुक्रवारी झालेल्या लिलाव बाजारसाठी २ हजार ४९५ कांदा गोण्यांची आवक झाली होती. यावेळी एक नंबरच्या कांद्याला २ हजार १०० ते २ हजार ७०० रुपये, दोन नंबरला १००० ते २ हजार रुपये, तीन नंबरला ३०० ते ९०० रुपये तर गोल्टी कांद्याला १ हजार ३०० ते १ हजार ७०० रुपयांचा दर मिळाला.

कांदा भावाने चांगलीच उसळी मारल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाच्या छटा दिसून येत होत्या. करोनाच्या संकटामुळे शासकीय नियमांचे पालन करीत येथे लिलाव प्रक्रिया होत आहे. परीसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना इतर कांदा बाजारच्या तुलनात्मक रास्त दर मिळत असल्याने त्यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती संगीता शिंदे, उपसभापती नितीन भागडे, संचालक नानासाहेब पवार, विद्याताई दाभाडे, सचिव किशोर काळे, उपबाजार व्यवस्थापक दिनकर पवार यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.