राहाता बाजार समितीत कांद्याला ३८०० रुपये

राहाता बाजार समितीत कांद्याला ३८०० रुपये

राहाता (तालुका प्रतिनिधी)

काल शुक्रवारी राहाता बाजार समितीत ५१११ गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला ३८०० रुपये भाव मिळाला. तर डाळिंबाला १७५ रुपये भाव मिळाला.

काल राहाता बाजार समितीत ५१११ गोणी कांद्याची आवक झाली. कांदा नंबर १ ला प्रति किंटलला ३२००ते ३८०० असा भाव मिळाला. कांदा नंबर २ ला २२५० ते ३१५० असा भाव मिळाला. कांदा नंबर ३ ला १२०० ते २३०० रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा २५०० ते २८०० व जोड कांदा २०० ते ११०० रुपये भाव मिळाला.

डाळिंबाची ९४३७ क्रेट्स ची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर १ ला १२६ ते १७५ इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर २ ला ८६ ते १२५ रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर ३ ला ४१ ते ते ८५ रुपये व डाळिंब नंबर ४ ला १० ते ४० रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्भव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.