कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत

कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत

खैरी निमगाव |वार्ताहर| Khairi Nimgav

तालुक्यातील शेतकर्‍यांचे कांदा हे मुख्य आणी नगदी पीक असून या पिकावर शेतकर्‍यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून असते. परंतू आठ महिने उन्हाळी कांद्याची साठवणूक करुन देखील त्यातून चार पैसे पदरात पडत नसेल तर कांदा साठवणूक करायची कशाला? असा प्रश्न शेतकर्‍यांना भेडसावत आहे.

कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत
सौंदाळा शिवारात धूम स्टाईलने प्राध्यापिकेच्या गळ्यातील गंठण चोरले

सुरुवातीला एप्रिल-मे महिन्यात शेतकर्‍यांनी उन्हाळी कांदा काढला. त्यावेळीही शेतकर्‍यांना हाच दर मिळत होता. आणि आता आठ महिने कांदा साठवण करूनही वजनात घट, सडण्याचे प्रमाण, यामुळे 30 ते 40 टक्के घट येऊनही शेतकर्‍यांची पाहिजे तशी पडताळ बसत नसल्याने उन्हाळी कांदा साठवणूक करून शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मध्यंतरी 3000 च्यावर गेलेला कांदा आठ महिन्यांपासून चाळीत ठेवूनही शेतकर्‍यांना 600 ते 1300 दराने विकावा लागत आहे. शेतकर्‍यांनी साठवलेल्या कांद्यात सडण्याचे, मोड येण्याचे प्रमाण, यामुळे मोठ्या प्रमाणात घट येत असल्याने शेतकर्‍यांचे अर्थचक्र बिघडले असून शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.

कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत
शहाणपण शिकवू नका

कांदा पिकाला दिवसेंदिवस अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने, वातावरणातील बदलामुळे व अवकाळी पावसामुळे लाल कांदा लागवड उशिरा झाल्याने पर्यायाने चाळीत साठवलेल्या उन्हाळी कांद्यातून चार पैसे पदरात पडतील, अशी शेतकर्‍यांना आशा होती. परंतू केंद्र सरकारच्या धोरणामुळे संभ्रमात सापडलेल्या शेतकर्‍यांचा कांदा मात्र भरडला गेला असून आहे त्या भावात शेतकर्‍यांना उन्हाळी कांदा विक्री करावा लागत आहे.

कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत
निळवंडेसाठी गौण खनिजे उपलब्ध करून द्या

दरम्यान, शेतकर्‍यांनी साडेतीन महिन्यापूर्वी लागवड केलेला लाल कांदा बाजारात येऊ लागल्याने त्याला पंधराशे ते दोन हजार दर मिळत आहे, उन्हाळी कांदा शेतकर्‍यांनी टिकवून धरला पण कांदा टिकवूनही त्यातून खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकर्‍यांचे अर्थचक्र बिघडले आहे.

कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत
आ. रोहित पवार यांचे आत्मक्लेश आंदोलन

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com