आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 'नाफेड'चा आधार

नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरु
आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 'नाफेड'चा आधार

श्रीगोंदा | Shrigonda

कधी ग्राहकांच्या तर कधी उत्पादन घेणाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणणारा कांदा (Onion) सध्या कमी भाव असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढतानाचे चित्र आहे.

मात्र, आता कांदा उत्पादकांना दिलासा देणारी गोष्ट झाली आहे. नाफेडच्या (NAFED) माध्यमातून आता कांदा खरेदी (Onion Purchase) करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी दिली आहे. यामुळे आता काही प्रमाणात कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.

कांद्याचे विक्रमी उत्पादन अपेक्षित असताना घसरलेले कांद्याचे दर सावरण्यासाठी नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरु करावी अशी विनंती अनिल घनवट यांनी शासनाकडे केली होती. दि. १९ एप्रील पासून महाराष्ट्रात नाफेड (National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd) मार्फत कांदा खरेदी करण्यात आली असल्याची माहिती अनिल घनवट यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात या वर्षी कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे. विक्रमी उत्पादन ही अपेक्षित आहे. कांद्याचे दर कोसळणयाची शक्याता लक्षात घेऊन अनिल घनवट यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar), केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर (Narendra Singh Tomar) व राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे (Dadasaheb Bhuse) यांची समक्ष भेट घेऊन निवेदन दिले होते. मुल्य स्थिरीकरण निधी अंतरगत, किमान १५/- रु प्रति किलो दराने कांदा खरेदी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

त्यांच्या या मागणीची दखल घेत शासनाने २ लाख २० हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पर्वी १ लाख सत्तर हजार कांदा खरेदी करण्यात आला होता, त्या तुलनेत ५० हजार टन कांदा जास्त खरेदी करण्यात येणार आहे. सध्या प्रचलित बाजारभावा प्रमाणेच कांदा खरेदी करण्याचा निर्णय नाफेडने घेण्यात आला आहे. कांदा खरेदीचा निर्णय झाल्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील २० शेतकरी उत्पादक कंपन्यांना कांदा खरेदी व साठवणुकीची जवाबदारी देण्यात आली आहे. मागील कांदा खरेदीच्या वेळेस बराच आर्थिक गैरप्रकार झाला असल्याचे समोर आले आहे. या वेळेस स्व. भा. पार्टीचे व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते खरेदी प्रक्रियेवर लक्ष ठेऊन राहणार आहेत.

Related Stories

No stories found.