कांदा उत्पादनात घट अन् दरही निम्म्यावर

उत्पादकांना यंदा दुहेरी फटका
कांदा उत्पादनात घट अन् दरही निम्म्यावर

देवगडफाटा |वार्ताहर| Devgad Phata

नेवासा तालुका (Newasa Taluka) हा जसा ऊसाचे (Sugarcane) आगार म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे आता कांदा उत्पादक (Onion Growers) आगार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. कारण गेल्या 15 वर्षापासून दरवर्षी कांदा लागवड (Onion planting) क्षेत्र वाढत आहे. या वर्षी तालुक्यात सुमारे 20 हजार हेक्टरवर उन्हाळी कांदा लागवड (Onion planting) झालेली आहे.

उन्हाळी हंगामात उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकर्‍यांनी (Farmer) मोठ्या प्रमाणात पीक (Crops) पध्दतीमध्ये बदल केला होता. हंगामाच्या सुरवातीला सर्वकाही सुरळीत होते. शिवाय मुबलक पाणीसाठ्यामुळे (Water Storage) उत्पादनात वाढ होईल असा आशावाद व्यक्त केला जात होता. परंतु उशिरापर्यत पाऊस हात राहिल्यामुळे कांदा लागवड (Onion planting) उशीराने झाली कमी थंडी (Cold), रोगाचा प्रादुर्भाव, उशिरा लागवड व जास्त ऊन यामुळे कांदा (Onion) पोसला गेला नाही. त्यामुळे एकरी 15 ते 16 टन निघणारा कांदा 5 ते 8 टन निघत आहे. माल कमी निघत असतानाच भावातही घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दुप्पट आर्थिक झटका बसत आहे.

उत्पादन घटले अन् बाजारात आवक जास्त असल्याने सुरवातीला दर घटले आहे पण दोन ते तीन महिने जर शेतकर्‍यांनी उन्हाळी कांद्याच्या साठवणुकीवर (Onion Storage) भर दिला तर चागला भाव मिळतो असा अनेक शेतकर्‍यांचा अंदाज आहे

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) शनिवारी कांद्यची जास्त आवक नोंदली गेली. जास्तीत जास्त भाव 1100 रुपय तर कमीतकमी 300 रुपयांपर्यंत भाव निघाले.

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) ज्याप्रमाणे शेतकरी कांदा उत्पादन घेतले जाते त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातही (Ahmednagar District) हे पीक उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यात नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात (Newasa Taluka) सलग तीन वर्षांपासून मुळा धरणाचे पाणी पूर्ण दाबाने मिळत असल्याने व जायकवाडी धरणातून सायपनी ने पाणी उपलब्ध झाल्याने शेतकरी कांदा पिकाकडे वळले आहे. विशेषतः तालुक्यातील गंगथडी परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड दरवर्षी केली जाते.त्याचप्रमाणे अनेक शेतकर्‍यांनी कांदा साठवणूकीसाठी कांदा चाळही उभारल्या आहे. त्याचाच आता उपयोग करुन भविष्यात दर वाढल्यावर कांद्याची विक्री (Sale of onions) केली जाणार आहे. परंतु काही भागातील शेतकर्‍यांकडे कांदा साठवणलकीसाठी कांदाचाळ नसल्याने त्या शेतकर्‍यांना मिळेल त्या भावात कांदा विक्री केल्या शिवाय पर्याय नसल्याने ते कांदा विक्री करतात. त्यामुळे जास्त कांदा मार्केटमध्ये येतो व भाव पडतात असा अंदाज आहे.

यावेळी ऐन उन्हाळी हंगामातील कांदा मार्केटमध्ये दाखल होत असतानाच दरात घसरण होण्यास सुरवात झाली होती. फेब्रुवारीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 3 हजार ते 3 हजार 500 पर्यंत दर मिळत होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी रात्रीचा दिवस करीत कांदा छाटणी करुन विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल केला मात्र, आवक वाढताच दर घसरले आहे. 3 हजार 500 वरचा कांदा थेट 1000 ते 800 रुपये क्विंटलवर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे शेतकरी आता विक्रीची गडबड न करता सरळ साठवणूकीवर लक्ष केंद्रीत करीत आहे.

कांदा साठवणुकीची गरज

चुकीच्या पद्धतीने साठवण केल्यास 45-60 टक्क्यांपर्यंत कांद्याचे नुकसान होऊ शकते. हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. त्यामुळे कांद्याचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी कांद्याची योग्य पध्दतीने साठवणूक होणे गरजेचे आहे. कांद्याची शास्त्रोक्त पध्दतीने साठवण केल्यास पूर्णपणे नुकसान टळेल असे नाही पण 15 ते 20 टक्क्यांपर्यंत नुकसान टळेल हे नक्की. कारण चाळीत 4-5 महिन्यापर्यंत कांदा सुस्थितीत राहू शकतो. त्यामुळे होणारे नुकसान टाळून शेतकर्‍याला आर्थिक फायदा वाढविता येऊ शकतो.

विक्रमी क्षेत्रातलागवड मात्र उत्पादनात घट

नेवासा तालुक्यात खरिपातील कांद्याचे अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे लाल कांद्याला विक्रमी दर मिळाला होता. खरिपात झालेले नुकसान उन्हाळी हंगामात भरुन काढण्यासाठी शेतकर्‍यांनी कांदा लागवडीवर भर दिला होता. पण खरिपाप्रमाणेच रब्बी हंगामातही अवकाळीची अवकृपा राहिल्याने कांदा उत्पादनात घट झाली आहे. असे असाताना मागणी नसल्याने कांद्याचे दर कमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी थेट कांदा सावठवणूकीवर भर देत आहे. भविष्यात दर वाढताच विक्री हे धोरण शेतकर्‍यांनी ठरवले आहे.

Related Stories

No stories found.