कांद्याचे बाजार वाढेना, शेतकरी चिंताग्रस्त

वखारीत खराब होण्याचे प्रमाण वाढले
कांदा उत्पादक शेतकरी
कांदा उत्पादक शेतकरी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पावसाळा चालू होऊन दोन महिले झाले तरी कांदा पंधरा रुपयाच्या पुढे जात नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढत आहे. महीन्या दोन महिन्यात नवीन लाल कांदा बाजारात येण्याची वेळ असते. तर वखारीतील कांदाही खराब होऊ लागल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.

साधारणपणे मार्च एप्रिल मे महिन्यात काढलेला गावराण कांदा शेतकरी बाजारभाव नसल्याने वखारीत साठवून ठेवतात आषाढ महीन्यात आवक मंदावल्यावर कांद्याचे बाजार वाढतात. त्यामुळे शेतकरी उन्हाळ्यात काढलेला कांदा जुलै ऑगस्ट महिन्यात याची विक्री करतात. परंतु या वर्षी आषाढ महिना संपला तरी कांदा 15 रुपये किलोच्या पुढे गेला नाही.

याबाबत पारनेर बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले की, आज रोजी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत 10 ते 15 रुपये दराने कांदा विकला जात असुन मागील महिन्यात 17 रुपये किलोच्या पुढे बाजार भेटला नाही. साधारणपणे 15, 16 ऑगस्ट नंतर कांद्याचे भाजारभाव हलू शकतात अशेही त्यांनी सांगितले. तीन चार महिने संभाळूनही कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे भांडवल ही गुंंतले व नफाही आडकला व तीन चार महिने झाले माल संभाळून ठेवला आहे आता तर रोजच्या पावसाने त्याला कोबही फुटू लागले आसल्याने शेतकरी चौहबाजुने आडचणीत सापडला आहे.

त्यातच या महिनाभरात जुना कांदा विकला नाही तर ऑगस्ट नंतर बाजारात नवीन लाल कांदा बाजारात विक्रीसाठी येवू शकतो आशा वेळी जुन्या कांद्याला ग्राहक मिळत नाही. मिळालेच तर ते पडीच्या भावात मातीमोल दराने मागणी करतात. बीयाचे वाढलेले दर, खते, औषधे यांच्या गगणाला भिडलेल्या किंमती दुर्बल झालेले मंजूर या सर्वांना तोंड देऊन पिकवलेला कांदा तीन चार महिने संभाळूनही आज बळीराजाच्या डोळ्यातुन पाणी काढत आहे.

ऑक्टोंबर पासून कांद्याची काळजी घेतली. हजारो रूपयांची खते, औषधे मारली. परंतु बाजार न वाढल्याने सर्व कांदा वाखारीत टाकला आहे. आता पावसाळ्यात तो खराब होत आहे. पुढे लाल कांदा सुरू झाल्यास हा कांदा मातीमोल होईल. सगळीकडून शेतकर्‍यांचे केवळ नुकसान आहे.

- सोमनाथ शिंदे, शेतकरी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com