कांद्याच्या भावात उसळी

श्रीरामपुरात 2400, पारनेरात 2800 रूपयांचा दर
कांद्याच्या भावात उसळी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. कुठे टोमॅटो 100 रुपये किलोने विकला जात आहे, तर कुठे प्रतिकिलो 120 रुपयांच्या पुढे गेला आहे. काही ठिकाणी टोमॅटोच्या दरात दिलासा मिळाला असला तरी आता कांद्याच्या दरातही वाढ होत असल्याने गृहिणींचे किचन बजेट बिघडणार आहे.

मध्यंतरी मातीमोल कांदा विकला जात होता. पण गत आठवड्यापासून कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. संगमनेरात कांद्याला प्रतिक्विंटल 2300 रुपये तर पारनेरात 2800 रुपयांपर्यंत दर मिळाला.

काल बुधवारी श्रीरामपूर बाजार समितीत 10056 गोणी उन्हाळ कांद्याची आवक झाली. 1 नंबर कांद्याला 1750 ते 2400 रुपयांचा भाव मिळाला. संगमनेर बाजार समिती आवारात उन्हाळ कांद्याची 5299 गोण्या आवक झाली. त्याला 200 ते 2300 रूपयांचा दर मिळाला तर पारनेरात 14173 कांदा गोणी आवक झाली. 300 ते 2800 रूपयांचा भाव मिळाला. कोपरगावात 12280 कांदा गोणी आवक झाली भाव 400 ते 2001 रूपयांचा दर मिळाला.

मंगळवारी कांद्याला राहुरीत प्रति क्विंटलमागे 200 ते 2400, अकोलेत 151 ते 2501, तर संगमनेरात 200 ते 2600 रूपयांचा दर मिळाला होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com