घोडेगावात कांद्याची 65 हजार गोण्या आवक भाव 2100 पर्यंत

घोडेगावात कांद्याची 65 हजार गोण्या आवक भाव 2100 पर्यंत

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) कांद्याची जवळपास 65 हजार गोण्या (64 हजार 901) गोण्या आवक झाली. या कांद्याचे एकूण वजन 36 हजार 650 क्विंटल इतके होते.

भाव जास्तीत जास्त 2100 रुपयांपर्यंत निघाला. कांद्याच्या एक नंबरच्या मालाला 1700 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाला 1500 ते 1600 रुपये, मध्यम मालाला 1400 ते 1500 रुपये, गोल्टा/गोल्टी कांद्याला 700 ते 1300 रुपये तर जोड कांद्याला 300 ते 400 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. तीन-चार वक्कलला 2000 ते 2100 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com