कांदा उत्पादक शेतकर्‍याला दिलेले अनुदान तुटपुंजे - आ. बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्यातील शेतकरी (Farmer) संकटात सापडलेला आहे. अवकाळी पावसाने शेतातील उभे पिक (Crops) वाया गेले आहे. सोयबीन (Soybeans), कापूस (Cotton), तूर (Tur), हरभरा (Gram), कांद्याला (Onion) बाजारात भाव मिळत नाही. कांद्याला यावेळी 400-500 रुपये भाव मिळत असून हा भाव अत्यंत कमी आहे. सरकारने प्रति क्विंटल 300 रुपये अनुदान जाहीर केले आहे, ते अत्यंत तुटपुंजे आहे. कांदा (Onion) उत्पादनास येणार्‍या खर्चाचा विचार करून सरकारने हे अनुदान किमान 500 रुपये करावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Congress MLA Balasaheb Thorat) यांनी केली आहे.

बाळासाहेब थोरात
ना.विखेंच्या मध्यस्थीने शिर्डीतील वादावर पडदा

विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले की, शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्या पिकावर नांगर फिरवत आहे, भाजीपाल्यालाही भाव नाही. कांद्याने (Onion) तर यावेळी शेतकर्‍यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे केले आहे. एक क्विंटल कांदा उत्पादनासाठी (Onion Production) 1100 ते 1200 रुपये खर्च येतो. कांदा काढण्यासच क्विंटलला 300 रुपये लागतात. हा खर्च पाहता शिंदे सरकारने जाहीर केलेले 300 रुपयांचे अनुदान (Grant) हे अत्यंत तुटपुंजे असून सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

बाळासाहेब थोरात
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी

अर्थसंकल्पात शेतकर्‍यावर सरकार मेहरबान असल्याचे चित्र दाखवण्यात आले, घोषणाच घोषणा करण्यात आल्या प्रत्यक्षात मात्र हे सरकार शेतकर्‍यांना मदत (Farmer Help) देताना हात आखडता घेते हे दिसून आले आहे. संकटात असलेल्या शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. शिंदे सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करुन किमान 500 रुपये तरी द्यावेत.

बाळासाहेब थोरात
संगमनेर नगरपरिषदेचे कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर

शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) तर नेहमीच होतात, असे असंवेदनशील विधान करुन कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी शेतकर्‍यांची क्रूर थट्टा केली आहे. शेतकर्‍याच्या पाठीशी उभे राहणे सरकारचे काम आहे. परंतु ते न करता सरकारमधील मंत्री शेतकरी आत्महत्यांबद्दल असे खोडसाळ विधान करतो हे निषेधार्ह आहे. मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या विधानाची तातडीने दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असे थोरात म्हणाले.

बाळासाहेब थोरात
मोटार वाहन निरीक्षकांवर अफरातफरीचा गुन्हा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com