श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सध्या सत्तेवर असलेले केंद्र सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या कांदा निर्यातबंदीच्या धोरणा विरोधात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस कमिटीने प्रांताधिकारी अनिल पवार यांना निवेदन दिले.त्याप्रसंगी ससाणे बोलत होते.

ससाणे म्हणाले की, जगभरात लॉकडाऊन असताना शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने कांद्याचे उत्पादन घेतले.कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकर्यांनी मोठा खर्च करून कांदा लागवड केलेली आहे. केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी जाहीर करून कांदा उत्पादक शेतकर्यांवर घोर अन्याय केला असल्याचे म्हटले.

जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्याची घोषणा केली होती. परंतु तीन महिन्यांतच घुमजाव करून आपला निर्णय बदलून शेतकर्यांवर अन्याय केला असल्याचे म्हटले आहे.

तालुका काँग्रेस अध्यक्ष अरुण पाटील नाईक म्हणाले की, शेतकर्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदीचा निर्णय तत्काळ मागे घेऊन सर्वसामान्य शेतकर्यांना न्याय द्यावा, अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात आमदार लहू कानडे व युवा नेते करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला .

प्रांताधिकारी अनिल पवार यांना दिलेल्या निवेदनावर उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य बाबासाहेब कोळसे, सतीश बोर्डे, सुभाष तोरणे, रमेश आव्हाड, दीपक कदम जालिंदर बेहळे आदींच्या सह्या आहेत.