विडी कामगारांच्या खात्यावर जमा होणार एक हजार

आ.जगताप, हमाल पंचातयचे घुले, सहाय्यक कामगार आयुक्तांसह कामगार युनियनच्या प्रयत्नांना यश
विडी कामगारांच्या खात्यावर जमा होणार एक हजार

अहमदनगर (प्रतिनिधी) - दीड वर्षापासून कडक निर्बंधामुळे विडी कारखाने बंद आहेत. त्यामुळे विडी कामगारांच्या हाताला काम नाही. यामुळे त्यांनी कुटूंबियांच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यानूसार संबंधीत विडी कंपनीकडे काम करणार्‍या कामगारांना त्या-त्या कंपनीच्यावतीने एक हजार रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

याप्रश्‍नी आ. संग्राम जगताप, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले व सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत आणि विडी कामगार युनियनने यासाठी प्रयत्न केले आहेत. करोनाच्या पार्श्‍वभुमीवर लॉकडाऊनमध्ये विडी उद्योग बंद असल्याने विडी कामगारांवर उपासमारीची वेळी आली आहे. या कामगारांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी लालबावटा विडी कामगार युनियनसह विविध कामगार संघटनांनी शासनाकडे तसेच विडी कंपन्यांकडे निवेदने, आंदोलने, उपोषणाद्वारे मागणी केली होती. तसेच याबाबत आ. जगताप व हमाल पंचायतीचे अध्यक्ष घुले यांनाही निवेदन देण्यात आले होते. त्यानूसार आ. जगताप, हमाल पंचातय जिल्हाध्यक्ष घुले, युनियनचे पदाधिकारी यांनी विडी कंपन्यांशी चर्चा करुन कामगारांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले व त्यास यश येऊन विडी कामगारांच्याा खात्यावर एक हजार रुपये टाकण्यास सुरुवात झाली आहे.

याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त राऊत यांनी सांगितले, निर्बंधामुळे अनेक छोट-मोठे उद्योग बंद आहेत. या उद्योगावर अवलंबून असणार्‍यांची संख्याही मोठी आहे. बंदमुळे अशा कामगारांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहेत. यात विडी कामगारांनी आंदोलनाचा पावित्र घेतल्याने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करुन तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याचबरोबर विडी कंपन्यांनीही कामगार कायद्याप्रमाणे कामगांराना संकट काळात मदत करणे कर्तव्य आहे, ही जाणिव करुन दिली. याबाबत विविध स्तरांवर होत असलेल्या पाठपुराव्यास यश मिळवून कंपन्यांनी विडी कामगारांच्या खात्यावर एक हजार रुपये टाकण्याचे मान्य करुन नोंदणीकृत विडी कामगारांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे काम सुरु असल्याने जिल्ह्यातील 4 हजार 500 विडी कामगारांना त्याचा लाभ मिळणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com