गाडीच्या टपावर बसून पारनेर आगारात एकाची दबंगगिरी

गाडीच्या टपावर बसून पारनेर आगारात एकाची दबंगगिरी

पारनेर | तालुका प्रतिनिधी

पारनेर एसटी आगार परीसरात खासगी वाहने लावण्यास बंदी असताना येथील एका धनदांडग्याच्या मुलाने चारचाकी गाडीच्या टपावर बसून बसस्थानकात चकरा मारत दबंग केल्याचा प्रकार आज घडला. बाहेरील वाहनांना बदी असताना शहरातील व परिसरातील धनधांडगे त्यांच्या आलिशान गाड्या विना परवाना प्रवेशद्वरावरच लावत असल्याने महामंडळाच्या वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे धनधांडगे स्थानिक प्रशासनाला अजिबात घाबरत नाहित. अशावंर एसटी प्रशासन तसेच पोलीसांनी कारवाई करावी अशी मागणी सामजिक कार्यकर्ते करत आहेत.

सविस्तर माहिती अशी की,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पारनेर आगार परीसरात कायमच खाजगी जागा असल्या सारखे पारनेर शहरातील व परिसरातील अलिशान गाड्यावाले गाड्या अस्ताव्यस्त गाड्या लावत असतात. त्यातच भर सोमवार दि.११ रोजी दुपारच्या वेळेत एक युवक चक्क एका आलीशान गाडीच्या टपावर बसून धूम स्टाइल २ करत असल्याचा प्रकार दिसून आला होता. हा प्रकार चक्क परिवहन विभागाच्या नाकावर टीच्चून करत असल्याने युवकांची ताकत वाढत आहे. या धूम स्टाइल हिरोला पोलीस प्रशासन व पारनेर आगार व्यवस्थापन कॅमेऱ्यातून शोधून काढून या अलिशान गाड्या वाल्यांना धडा शिकवतील का असा प्रश्न सर्व सामान्य प्रवाश्यांना पडत आहे. पारनेर आगार व्यवस्थापक व पोलीस प्रशासन यांनी सर्व सामान्य प्रवाश्यांना सुरक्षा देण्यासाठी प्रामाणिक मागणी करावी अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com