पठारे टोळीतील एकास अटक

पठारे टोळीतील एकास अटक

एलसीबीची कामगिरी: 24 मेपर्यंत पोलीस कोठडी

अहमदनगर (प्रतिनिधी) - विजय पठारे व त्याच्या टोळीने बुधवारी एकावर चाकू हल्ला करत मारहाण केली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. संतोष नवगिरे (रा. कल्याणरोड, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 24 मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.

बुधवारी दुपारी दिनेश मनोहर पंडीत हे त्यांच्या सिध्दार्थनगरमधील सुडके मळ्यात घरासमोर उभे असताना दुचाकीवरून आलेल्या विजय राजू पठारे (रा. सिध्दार्थनगर), संतोष नवगिरे (रा. कल्याणरोड, नगर), गणेश सुरेश पठारे व विजय पठारेचा एक मित्र यांनी पंडीत यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर विजय पठारे याने त्याच्याकडील चाकूने पंडीत यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केली. पंडीत यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध खूनाच्या प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com