देवगाव येथे दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक : एक ठार, दुसरा जखमी

देवगाव येथे दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक : एक ठार, दुसरा जखमी

देवगाव (वार्ताहर) - नेवासा तालुक्यातील देवगाव येथे दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर दुसरा जखमी झाला.

याबाबत माहिती अशी की, कुकाणा- घोडेगाव रोडवर सकाळी साडेनऊच्या सुमारास कुकाणा-घोडेगाव रस्त्यावर कॅनॉलनजीक दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये भाऊसाहेब बबन ठोंबरे (वय 45) रा. देवगांव हे जागेवरच ठार झाले. तर अमोल संजय नेटके (वय 27) रा देवगाव हा तरुण गंभीर जखमी झाला.

मयत भाऊसाहेब ठोंबरे हे आपल्या रानातल्या वस्तीवरून गावामध्ये घरगुती सामान आणण्यासाठी येत असताना गावातील अमोल नेटके हा आपल्या वैयक्तीत कामानिमित्ताने देवगाव - घोडेगाव रोडने जात असताना या दोघांच्या मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली.

अपघातात दोन्हीही दुचाकींचे मोठे नुकसान झाले. रस्त्यावर फारशी रहदारी नसताना एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. मयत भाऊसाहेब ठोंबरे अंत्यत गरिब व मनमिळावू स्वभावचे होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com