आरडगावच्या अपघातातील एका जखमीचा मृत्यू

आरडगावच्या अपघातातील एका जखमीचा मृत्यू

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी-मांजरी रस्त्यावर आरडगाव शिवारात दोन मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातातील मानोरी येथील ॠतुराज अशोक काळे या तरुणाचा नगर येथील रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला तर सहा जखमी पैकी एकाची प्रकृत्ती चिंताजनक असल्याचे समजते. राहुरी-मांजरी रस्त्यावर आरडगाव येथे रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आरडगाव शिवारातील देशमुख विटभट्टीच्या जवळ हा भीषण अपघात घडला अपघात इतका भीषण होता की दोन्ही मोटारसायकल चक्काचूर झाल्या आहेत.

तर सर्वच सात जण जखमींना स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू करत रुग्णवाहिकेला पाचारण केले. जखमींना वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत हलविण्यात आले. दरम्यान, रुग्णालयात नेत असतानाच मानोरी येथील ॠतुराज काळे (वय 21) याचा मृत्यू झाला आहे. तर मयूर मोरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. कोंढवड येथील जखमींना खाजगी रुग्णांलयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मयत ॠतुराज काळे याच्या वडीलांचा त्याच्या लहानपणीच मृत्यू झाल्याने त्याची आई, बहीण सोबत तो मानोरी येथील आपल्या मामाच्या घरी रहात होता. काल दुपारी त्याच्यावर मानोरी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com