शंभर रुपयांच्या स्टँप पेपरसाठी नागरिकांची मोठी दमछाक

शंभर रुपयांच्या स्टँप पेपरसाठी नागरिकांची मोठी दमछाक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शंभर रुपयांचा स्टँप पेपर (Stamp paper) मिळण्यासाठी काही शेतकर्‍यांची श्रीरामपूर (Shrirampur) येथे चांगलीच दमछाक झाली. स्टँप पेपरची (Stamp paper) मुद्दाम कृत्रीम टंचाई (artificial scarcity) दाखविण्याचा प्रकार आहे का? अशी साशंकता व्यक्त केली जात आहे.

पुणतांबा (Puntamba) येथील एका शेतकर्‍याला स्वतःचे शेत तारण ठेऊन बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) पुणतांबा येथील शाखेतून पीक कर्ज (Crops Loan) घ्यावयाचे होते. त्यासाठी त्याला 100 रुपयांच्या सात स्टॅप पेपरची (Stamp paper) गरज होती. राहात्याला जाणे गैरसोयीचे म्हणून त्याने श्रीरामपूरला प्राधान्य दिले. श्रीरामपुरात (Shrirampur) एकूण 12 स्टँप वेंडर ( Stamp vendor) आहेत, अशी माहिती खुद्द एका स्टँप वेंडरने दिली. शुक्रवारी बर्‍याच ठिकाणी संबंधित शेतकर्‍याने स्टँपची मागणी केली असता संपले आहेत, तसेच एखाद्या स्टँप वेंडरकडे महत्त्वाचे काम असेल तर नंतर या, असे उत्तर मिळाले.

विशेष म्हणजे प्रशासकीय इमारतीत एका स्टॅप वेंडरकडे तर संबंधिताला वाईट अनुभव आला. संबंधित वेंडर मागे व्हा, नीट उभे राहा, सूर्यप्रकाश येऊ द्या, अशा सूचनांचा गर्दी नसताना वयाने ज्येेष्ठ असणार्‍या नागरिक, शेतकरी यांना उपदेश पाजत होता. कामापेक्षा इतर बाबीची चर्चा ऐकून अनेकांनी भिक नको पण कुत्रे आवर असे समजून काढता पाय घेतला. तर सोमवारी मात्र त्यांना स्टँप पेपर मिळाले. मात्र त्यासाठी पायपीट करावीच लागली. एकूणच नागरिकांची अडवणूक करणार्‍या स्टॅम्प वेंडवरवर कारवाई करावी, अशी मागणी संबंधितांनी श्रीरामपूरच्या तहसीलदारांकडे केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com