आरडगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार, एक जखमी

(प्रतिकात्मक छायाचित्र)
(प्रतिकात्मक छायाचित्र)

आरडगाव (वार्ताहर)

राहुरीच्या पूर्व भागात आरडगांव येथे शुक्रवारी मध्यरात्री झुगे वस्तीवर बिबट्याने हल्ला करीत येथील शेतकरी कचरू भाऊसाहेब झुगे यांच्या घरासमोरील गोठ्यातील एका शेळीला ठार केले.

तर एकीला जखमी अवस्थेत सोडून पोबारा केला. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या भागात तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

मागील आठवड्यात बिबट्याने या भागातील कुत्रा व शेळीवर हल्ला करीत फस्त केले होते. आता पुन्हा झुगे वस्तीवर ही घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे बिबट्यामुळे शेतकर्‍यांचे पशुधन धोक्यात आले आहे. बिबट्यांचा रात्री परिसरात मुक्त संचार वाढला आहे.  बिबट्याच्या दहशतीने रात्रीच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.

दुध उत्पादकांना दूध डेअरी पर्यंत पोहचविण्यास भिती निर्माण झाली आहे.  तसेच बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकरी रात्र जागून काढत आहे. बिबट्याला पळून लावण्यासाठी फटाके वाजवून टेंभे लावले जात आहे. या परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. वन विभागाच्या वतीने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत या मागणीने जोर धरला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com