देर्डे कोऱ्हाळे ‌परिसरात हल्ल्यात एक शेळी ठार

बिबट्याच्या दहशतीकडे वन विभागाचे दुर्लक्ष
(प्रतिकात्मक छायाचित्र)
(प्रतिकात्मक छायाचित्र)

कोपरगाव | वार्ताहर

कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे परिसरात गेल्या दोन-तीन महिन्यापासून बिबट्याची दहशत असून बिबट्याच्या वास्तव्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हाच बिबट्या पोहेगाव व इतरत्र परिसरातही आढळून आला आहे.

वन विभागाचे मात्र या बिबट्याच्या दहशतीकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने या परिसरात तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी देर्डे कोऱ्हाळेचे सरपंच योगीराज देशमुख यांनी केली आहे.

काल रात्री देर्डे कोऱ्हाळे येथील विघे वस्तीवर या बिबट्याने आपला मोर्चा वळवला होता. चंद्रभान हिरामण पवार यांच्या गोठ्यातील शेळी या बिबट्याने ठार केली. रात्री कुत्रे भुंकण्याच्या आवाजाने पवार यांना जाग आली असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. आरडाओरड करून त्यांनी शेजारीपाजारी असलेल्या नागरिकांना आवाज दिला. त्यामुळे बिबट्या तेथून पसार झाला.

मात्र पुन्हा बिबट्या येतो की काय याधास्तीने विघे वस्तीवर असलेल्या नागरिकांनी रात्र जागून काढली. सदर घटनेची माहिती सरपंच योगुराज देशमुख यांना पवार यांनी दिली असता त्यांनी घटनास्थळी दाखल होत भयभीत झालेल्या नागरिकांना आधार दिला. या बिबट्याची पोहेगाव परिसरात गेल्या सहा महिन्यापासून दहशत असून वन विभागाने साधा या परिसरात पिंजरा देखील लावलेला नाही.

बिबट्याची संख्या एक किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचे नागरिकांकडून बोलले जाते. वन विभागाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून देर्डे कोऱ्हाळे परिसरात ह्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावा अशी मागणी सरपंच योगीराज देशमुख यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com