सोलापूरच्या एकाला नगरमध्ये लुटले

स्वस्तात गोडतेलाचे डबे देण्याचे आमिष दाखविले; सहा जणांविरूद्ध गुन्हा

सोलापूरच्या एकाला नगरमध्ये लुटले

अहमदनगर (प्रतिनिधी) -

स्वस्तात गोडतेलाचे डबे देतो म्हणून एकाला निर्जनस्थळी बोलून घेतले. सहा जणांनी त्याला मारहाण करीत त्याच्याकडील 60 हजाराची

रोख रक्कम, दोन मोबाईल असा 76 हजाराचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला. नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारातील निर्जनस्थळी ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरूद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हर्षल शिवशंकर चौधरी (वय 31 रा. अकलुज ता. माळशिरज जि. सोलापूर) असे लुटमार झालेल्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यादव व जाधव (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. खडकी ता. नगर), अनोळखी चार इसम यांच्याविरूद्ध हा गुन्हा दाखल केला आहे. यातील यादव व जाधव यांनी फिर्यादी यांना स्वस्तात गोडतेलाचे डबे देतो असे अमिष दाखवून घोसपुरी शिवारातील निर्जनस्थळी बोलून घेतले.

फिर्यादीने स्वस्तात गोडतेल घेण्यासाठी सोबत पैसे आणले होते. फिर्यादी येताच यादव व जाधव यांनी इतर चौघांच्या मदतीने फिर्यादीला दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत 60 हजाराची रक्कम व दोन मोबाईल बळजबरीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, नगर तालुक्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी भेट दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com