‘एक शेतकरी, एक वाहन चालक’

संगमनेर बाजार समितीचा निर्णय
‘एक शेतकरी, एक वाहन चालक’

संगमनेर (प्रतिनिधी) - संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये वाढती करोनाची रुग्ण संख्या लक्षात घेता संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने ‘एक शेतकरी एक वाहन चालक’ नियमाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. वाहन व चालक यांना निर्जंतुकीकरणानंतरच बाजार समितीमध्ये प्रवेश देण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली.

संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यासह संगमनेर शहर आणि तालुक्यात करोनाने चांगलेच थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोविड बाधित रुग्णसंख्रेत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये संपूर्ण तालुक्यातून शेतकरी कांदा, टोमॅटो, डाळिंब घेऊन विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात रेत असतात, यामुळे बाजार समितीच्या परिसरामध्ये शेतकरी व्यापारी हमाल-मापाडी आदींची मोठी गर्दी होत असते.

करोनाच्या काळात ही गर्दी वाढू नरे, ही बाब लक्षात घेऊन सभापती शंकरराव खेमनर आणि बाजार समितीचे सचिव सतिश गुंजाळ यांनी यांनी तत्काळ बाजार समितीतील सर्वच घटकांना खबरदारीच्या सूचना देत कठोर पावले उचलण्याबाबत सुचित केले आहे. बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वतंत्र सुरक्षारक्षकांची नेमणुक केली आहे. बाजार समितीत येणार्‍या प्रत्येक वाहनावर प्रवेशद्वारातच सॅनिटाझींग करून निर्जंतुकीकरण केल्यानंतरच वाहने बाजार समितीत सोडली जात आहे.

प्रत्येक वाहनाच्या बरोबर एक शेतकरी आणि एक चालक यांच्या व्यतिरिक्त कुणालाही सोडले जात नाही तसेच बाजार समितीच्या आवारात प्रवेश करणार्‍यांना ‘नो मास्क नो एंट्री’ हा नियम सक्तीचा केला असून तोंडाला मास्क असल्याशिवाय बाजार समितीच्या आवारातच प्रवेश दिला जात नाही. बाजार समितीच्या घटकांव्यतिरिक्त लहान मुले, वयोवृद्धांना आतमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली असून प्रत्येकाने या कडक निर्बंधाचे पालन करावे, असे आवाहन संगमनेर कृषी उत्पन्न्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com