<p><strong>नेवासा । तालुका वार्ताहर । Newasa </strong></p><p>नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे शेत जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत दत्तात्रय लक्ष्मण ठोंबरे (वय- 45) यांचा मृत्यू झाला आहे.</p>.<p>याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील रस्त्याच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये दत्तात्रय लक्ष्मण ठोंबरे हे जखमी झाल्याने त्यांना प्रथम नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. दुखापत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर पोलीस शिपाई राहुल यादव करीत आहे.</p>