कार-जीपच्या अपघातात एकाचा मृत्यू

कार-जीपच्या अपघातात एकाचा मृत्यू

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - अल्टो कार व बोलेरो जिपचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. वहीद इमाम पठाण (रा. चिंचविहीरे ता. राहुरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नगर- पुणे रोडवरील कामरगाव शिवारात हा अपघात झाला.

या प्रकरणी अज्ञात अल्टो कार चालकाविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अपघातात जखमी झालेले अकबर हुसेन पठाण (वय 53 रा. चिंचविहीरे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व त्यांचा भाऊ वहीद हे त्यांच्या बोलेरो जिपमधून नगर- पुणे रोडवरून प्रवास करत असताना कामरगाव शिवारात समोरून आलेल्या अल्टो कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला आदळून बोलेरो जिपच्या बोनेट व काचवर आदळली. या अपघातात फिर्यादी जखमी झाले असून त्यांचा भाऊ वहीद मृत झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मरकड करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com