कालव्याच्या कामासाठी खोदलेल्या नाल्यात पडून एकाचा मृत्यू
सार्वमत

कालव्याच्या कामासाठी खोदलेल्या नाल्यात पडून एकाचा मृत्यू

ठेकेदाराविरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Nilesh Jadhav

अकोले | प्रतिनिधी | Akole

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या नाल्यात पडून एकाचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. संबंधित ठेकेदाराने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची काळजी न घेतल्याने म्हाळादेवी येथील नागरिकास प्राण गमवावे लागण्याची घटना घडली आहे.

चंद्रभान परशुराम हासे (वय-61 रा.म्हाळादेवी) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान संबंधित काम करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी म्हाळादेवीचे सरपंच व खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप हासे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com