
सोनई |वार्ताहर| Sonai
घोडेगावचा आठवडे बाजार करून टेम्पोतून सोनईकडे परतत असताना टेम्पोतून पडून एकजण जखमी होऊन मयत झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
याबाबत माहिती अशी, सोनई-घोडेगाव रस्त्यावर शुक्रवार दि. 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सोनईजवळील दत्तनगर येथील संजय लक्ष्मण गोरे (वय 55) हे घोडेगावचा आठवडे बाजार करून टेम्पोतून येत असताना हॉटेल तोरणासमोर टेम्पोतून पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने मयत झाले. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक बाळासाहेब बाचकर करत आहेत.