कोपरगावात आणखी एक महिला करोना पॉझिटीव्ह

43 अहवाल आज निगेटिव्ह आले
कोपरगावात आणखी एक महिला करोना पॉझिटीव्ह

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

शहरातील सुख शांती नगर मध्ये आणखी एक महिला करोना बाधित रुग्ण रविवारी आढळून आल. सुख शांती नगर, सहजानंदनगर आणि धारणगाव येथील 2 पुरुष 1 महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सदरील परिसर प्रशासनाने सील करून 44 जणांचे स्राव तपासणीसाठी पाठवले होते त्यात 43 अहवाल आज निगेटिव्ह आले आहे तर सुखशांती नगर मधील आणखी एका महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोपरगाव शहरवासीयांची धकधक वाढली आहे.

तालुक्यात काल दिवसभरात 5 अहवाल करोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये कोकमठाण ( शामवाडी ) येथील 32 वर्षीय पुरुष, शहरातील सुखशांती नगर येथील 55 वर्षीय पुरुष, सहजानंदनगर येथील 52 वर्षीय पुरुष तसेच धारणगाव येथील 30 वर्षीय आशा सेविका व शहरातील श्रद्धा पॅराडाईज येथील येथील परिचारिका या 5 जणांचे अहवाल 18 जुलै रोजी दिवसभरात पॉझिटिव्ह आले होते. त्याच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासनाच्या वतीने शोध घेऊन क्वॉरंन्टाईन केले होते.

बाधित रुग्णांच्या संपर्कातील 44 व्यक्तींचे स्राव तपासणी नेण्यात आले होते. त्याचे नमुने रविवार दि. 19 जुलै रोजी आले असून त्यामध्ये शहरातील सुखशांती नगर मधील एक महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे तर 43 जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. आज करोना बाधित आलेली महिला सुखशांती नगर येथील काल आढळलेल्या बाधित रुग्णाची पत्नी असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधिक्षक कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

स्थानिक प्रशासनाच्या वतीने संपूर्ण परिसर सील करण्याचे काम सुरू केले आहे. कोपरगाव तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या 30 झाली असून त्यापैकी एक महिला मयत झाली आहे. 17 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे तर उर्वरित 12 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com