अखेर चांद्यामध्ये करोनाचा शिरकाव
सार्वमत

अखेर चांद्यामध्ये करोनाचा शिरकाव

चांदा हे मोठया लोकसंख्येचे गाव

Nilesh Jadhav

चांदा | वार्ताहर | Chanda

नेवासा तालुक्यासह सर्वत्र करोनाचा कहर सुरू असताना तालुक्यातील चांदा येथे आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आज आलेल्या अहवालात एक रुग्ण आढळुन आला असल्याची माहिती चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. रजनिकांत पुंड यांनी दिली आहे. यामुळे चांद्यात खळबळ उडाली आहे

चांदा हे मोठया लोकसंख्येचे गाव आहे. मात्र आतापर्यंत येथे करोनाचा शिरकाव झाला नव्हता, मात्र आज सायंकाळी आलेल्या वैदयकिय अहवालानुसार गावात एक रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सदर व्यक्तीस त्रास सुरु होताच सिव्हिल हॉस्पीटलमध्ये अडमिट झाल्याची माहिती मिळाली असून त्याची तपासणी केली असता तो आज बाधित आढळुन आला असल्याचे डॉ. पुंड यांनी सांगितले

दरम्यान रुग्ण आढळला त्या ठिकाणचा परिसर बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे. संबधीत परीसरासह गाव बंद ठेवण्यासंदर्भातही उपाययोजना सुरू झाल्या आहे. अहवाल सायंकाळी आला असला तरी सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून खबरदारीचा उपाययोजना संदर्भात निर्णय घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान गावात सध्या रोज सकाळी प्रचंड गर्दी होत असून गर्दीला नियंत्रित करण्यासाठी प्रशासन कठोर भुमिका घेणार असल्याचे समजते आहे.

Deshdoot
www.deshdoot.com