४६ किलो गांजासह एक जण ताब्यात

एकूण आठ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
४६ किलो गांजासह एक जण ताब्यात

श्रीरामपूर l प्रतिनिधी l Shrirampur

शहरातील देवकर वस्तीवर गांजा विक्री करणार्‍या इसमास काल श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख ६० हजार रुपये किमतीचा ४६ किलो गांजा व ४ लाख रुपये किमतीची एक महिंद्रा बोलेरो पिकपअसा एकूण ८ लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकास अटक करण्यात आली आहे.

Title Name
संगमनेर : घारगावमध्ये अ‍ॅम्ब्युलन्सची चोरी
४६ किलो गांजासह एक जण ताब्यात

श्रीरामपूर शहरात गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना कळताच पोलीस अधिक्षक़ मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील पोलीस हेड कॉन्टेबल जोसेफ साळवी, पोलीस नाईक करमल, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, राहुल नरवडे, किशोर जाधव,सुनील दिघे यांनी सदरची कारवाई करत अचानक छापा मारला.

यात पोलिसांनी देवकरवस्ती, वॉर्ड नं. 7, श्रीरामपूर येथील गणेश भास्कर सरोदे (वय 38) त्याचेकडून ४ लाख ६० हजार रुपयांचा ४६ किलो गांजा व ४ लाख रुपये किंमतीची महेंद्र बोलेरा पिकअप एकूण ८ लाख साठ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. याप्रकरणी श्रीरापूर शहर पोलीस ठाण्यात गणेश भास्कर सरोदे याचेविरुध्द गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com