वृद्धेस मारहाण करत जबरी चोरी करणार्‍यास अटक

52 हजारांचा ऐवज लंपास
वृद्धेस मारहाण करत जबरी चोरी करणार्‍यास अटक

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील कोळवडी परिरात 75 वर्षाची वृद्ध महिलेचा गळा दाबून, मारहाण करत कानातील व गळ्यातील दागिने बळजबरीने चोरून नेहणार्‍या चोरट्याला कर्जत पोलिसांनी शिताफिने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 52 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोखरणा अभिमान काळे (24, रा. राशीन, ता. कर्जत) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तर त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. या प्रकरणी ठकूबाई लाला खानवटे (75, रा कोळवडी, ता. कर्जत) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार 25 ऑगस्ट रोजी मध्यरात्री त्या घराच्या पोर्चमध्ये झोपल्या असताना घरात चोरू करून दोन चोरटे बाहेर आले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी ठकुबाई यांचा गळा दाबून चापटीने मारहाण केली. ठार मारण्याची धमकी देत गळ्यातील सोन्याच्या मण्याची माळ, कानातील सोन्याची फुले असा एकूण 35 हजारांचा मुद्देमाल बळजबरीने ओढून नेला.

त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी गौतम अनिल डोंडे (रा. कानगुडवाडी (ता.कर्जत) हे बंगल्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पत्र्याचे शेडमधून. त्यांचे व सहकार्‍यांचे 17 हजार 990 रुपये किमतीचे मोबाईल चोरी गेल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनाुंचा तपास करताना कर्जत पोलिसांनी गोपनीय माहिती काढून संशयित पोखरणा अभिमान काळे यास ताब्यात घेतले चौकशी केली असता त्याने साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे, पोलीस जवान मारुती काळे, श्याम जाधव, पांडुरंग भांडवलकर, गोवर्धन कदम, भाऊ काळे, अर्जुन पोकळे, संपत शिंदे यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com