जुन्या पेन्शनसाठी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार

जुन्या पेन्शनसाठी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार

मोठ्या संख्येने शिक्षक मुंबईत दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील सर्व विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदावर आणि तुकड्यांवर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सहा दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात जुनी पेन्शन कोअर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटनेच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

सामुदायिक आत्मदहनासाठी सोमवारी (दि.27 डिसेंबर) विधानभवनाकडे आंदोलकांनी कूच केली होती. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवून संघटनेच्या प्रमुख नेत्यांसह आंदोलक शिक्षकांना अटक केली. करोना काळात तसेच पेन्शन नसल्यामुळे भविष्याच्या चिंतेतून बहुसंख्य शिक्षक मयत झाले आहेत. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, तसेच मयत शिक्षकांच्या पाल्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी आझाद मैदानावर 23 डिसेंबरपासून महाविश्वास धरणे आंदोलन सुरू आहे.

आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने शिक्षकांनी मुंडन करून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला आहे. आंदोलनात संगीता शिंदे, महेंद्र हिंगे, दिलीप डोंगरे, श्रीधर गोंधळी, संभाजी पाटील, राजू पठाण, रवींद्र पाटील, अजित गणाचारी, चित्रा जोशी, सलमा शेख, नंदा डूबरे, रावसाहेब गीते, गिरासे इंद्रसिंग, विजय कोंडूस्कर, मोईन काझी, कैलास चौधरी, गजानन काटे, राजमोहंमद देसाई, निशिगंधा राऊत, छाया सावंत, मीना गावफले, व्यंकटराव जाधव, बबन शिंदे, संजय कळकुंबे, सिद्दू माचेट्टी, अर्पिता चव्हाण आदी 26 आंदोलकांना अटक करून मुंबई येथील येलोगेट पोलीस स्टेशनला ठेवण्यात आले होते. संध्याकाळी उशीरा आंदोलकांची सुटका करण्यात आली. या आंदोलनात सुनील दानवे, बद्रीनाथ शिंदे, दिलीप बोठे, व्यंकटराव जाधव, मधुकर घुगे, अण्णासाहेब गायकवाड आदी शिक्षक सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com