तेल काढण्याचे मशीन घेऊन तीन लाखांना फसवले

तोफखाना पोलिसांत चौघांवर गुन्हा
Fraud (फसवणुक)
Fraud (फसवणुक)

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एका कंपनीने तीन लाख रुपये घेऊन खाद्य तेल काढण्याचे मशीन दिली. परंतु करारनामा करून ठरल्याप्रमाणे कंपनीने माल न देता फसवणूक केली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरिता अशोक पंडीत (वय 22 रा. वसंत टॉकीजजवळ, माळीवाडा) यांनी फिर्याद दिली आहे.

बायोलाईफ अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड फॅमिली वेलनेस कंपनीचे मालक बंडू किसनराव वाघ (रा. आहीरे गाव, वारजे, माळीवाडी, पुणे), अमोल पोपटराव मेटे (रा. सोमवार पेठ, पुणे), निता रामदास पाटील (रा. शिंदे मळा, सावेडी, नगर), निलिमा अनिल खाटेकर (रा. बालिकाश्रम रोड, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बायोलाईफ अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड फॅमिली वेलनेस कंपनीने एक स्किम काढली होती.

त्यानुसार कंपनीला तीन लाख रुपये द्यायचे व त्याबदल्यात कंपनी खाद्य तेलाची मशीन देऊन जे खाद्य पदार्थ कंपनी देणार त्याचे तेल काढून द्यायचे व त्याबदल्यात कंपनी महिन्याला 25 हजार रुपये व जे वीज बिल आले असेल ते देणार, अशी ती स्किम होती. सदर कंपनीच्या कागदपत्रांची फिर्यादी यांनी पडताळणी केली असता सदरची कंपनी बंडू वाघ व अमोल मेटे यांच्या नावे असल्याचे माहिती मिळाली होती. फिर्यादी मशीन घेण्यासाठी तयार झाले. बंडू वाघ याने कंपनी स्किम प्रमाणे करारनामा केला. त्यावेळी निता पाटील, निलिमा खाटेकर हजर होत्या.

बंडूु वाघ याने कंपनीच्या दिलेल्या खात्यावर फिर्यादी यांनी तीन लाख रुपये पाठविले होते. दरम्यान करारनाम्यात ठरल्याप्रमाणे मशीन देऊन दोन महिने कंपनीने माल दिला व तयार माल पण घेऊन गेले. परंतु दोन महिन्यांनंतर कंपनी प्रतिनिधींनी टाळाटाळ करून फोन बंद केले. दरम्यान फिर्यादी व त्यांच्या पतीने माहिती काढली असता नगरमधून विजय संताजीराव औटी, मनीषा कैलास हुंडेकरी, सुजीत रत्नाकर खरमाळे, शितल अभयसिंग भगत यांनी देखील पैसे भरून मशीन घेतले होते. त्यांची देखील फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com