भेंडा बुद्रुक येथील नियोजित आरोग्य केंद्राच्या जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी

भेंडा बुद्रुक येथील नियोजित आरोग्य केंद्राच्या जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी

भेंडा (वार्ताहर) / Bhenda - माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.राजश्रीताई घुले पाटील यांचे प्रयत्नाने मंजूर झालेल्या भेंडा बुद्रुक येथील नियोजित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (primary health center) जागेची पहाणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी केली.

नेवासा (newasa) तालुक्यातील भेंडा बुद्रुक (Bhenda Budruk) येथे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करणेबाबत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.राजश्रीताई घुले पाटील यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला.त्यास यश मिळून प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यास शासन मान्यता मिळाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दि.28 जून रोजी याबाबद शासन निर्णय जारी करून भेंडा बुद्रुक येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.

या शासन निर्णयात म्हंटले आहे की, मौजे भेंडा बुद्रुक ता.नेवासा , जि.अहमदनगर येथे नविन प्राथमिक आरोग्य केंद्र करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. मौजे भेंडा,ता.नेवासा , जि.अहमदनगर येथे “ विशेष बाब " म्हणून नविन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी विहित पध्दतीने जागा अधिग्रहीत करुन सदर जागेवर प्राथमिक आरोग्य केद्रांचे बांधकाम जिल्हापरिषद कार्यालयाकडून पूर्ण झाल्यावर विभागाकडून पदनिर्मिती करण्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल.

हा शासन निर्णय प्राप्त होताच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र परदेशी,कनिष्ठ अभियंता गणेश सवई,नेवासाचे उपअभियंता संजय घुले यांनी भेंडा बुद्रुक येथे होणाऱ्या नियोजित प्रथिमक आरोग्य केंद्राच्या जागेची पहाणी केली.यावेळी नेवासा बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे,तुकाराम मिसाळ,विलास लोखंडे,अंबादास गोंडे,बापूसाहेब नवले,राजेंद्र चिंधे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com