महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍याला 3 दिवसांची कोठडी

महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍याला 3 दिवसांची कोठडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी नगरमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य करून ते सोशल मीडियावर व्हायरल करणार्‍या मुकुंदनगरमधील अरमान शेख याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुकुंदनगरच्या शेख यांनी शनिवारी (दि.5) रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली होती. याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या युवकाला अवघ्या अर्ध्या तासात नगर शहरातून ताब्यात घेत अटक केली.

अरमान नईम शेख (वय 19 रा. गजानन हाउसिंग सोसायटी, मुकुंदनगर) असे त्याचे नाव आहे. शेख याच्यासह त्याच्या अनोळखी साथीदारांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेख याला रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची (दि. 9) पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी मनिष औशीकर (रा. रेल्वे स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com