
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
तालुक्यातील पाबळ या गावात एका युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडियावर टाकली आहे. संशयित युवकावर गुन्हा दाखल करून पोलीसांनी युवकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यन हिदूंत्ववादी संघटनांनी आवाहन केल्याने पारनेर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
तालुक्यातील पाबळ येथील वसीम सय्यद या तरुणास पोलीसांनी अटक केली आहे. पारनेर तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटने कडून या निषेधार्थ पारनेर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. पारनेर शहरातील बाजारपेठेत सम्पूर्ण शुकशुकाट दिसून आला. यादरम्यान वसीम सय्यद च्या पोस्ट बाबत समाज माध्यमात उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ पारनेर व्यावसायिक व्यापारी सर्वांनी बंद पाळला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपहार्य पोस्ट करणार्या तरुणावर तात्काळ गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्याबाबत पारनेर येथील हिंदुत्ववादी तरुणांनी मागणी करत पोलीस स्टेशन समोर ठाण मांडले. यामध्ये तुषार औटी, आबा देशमुख, गणेश कावरे, अक्षय चेडे, ऋषि गंधाडे, स्वप्निल पुजारी, रायभान औटी, धीरज महांडूळे, सतीश म्हस्के, संभाजी मगर, अनिकेत औटी आदी उपस्थित होते.
या संदर्भात फिर्याद संदीप चंद्रकांत कावरे यांनी दिली असून यात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज अखंड भारताचे दैवत असून त्यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वसीम बाबा सय्यद यांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारनेर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान उगले करत आहे.
शिवाजी महाराजांचा संदर्भात समाज माध्यमांद्वारे आक्षेपार्ह पोस्ट करणार्या तरुणाने अळकुटी येथे येऊन माफी मागितली. मात्र ग्रामस्थांनी केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट बाबत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून ळकुटी सह पारनेर तालुका बंद ठेवण्याच्या निर्णयावर हिंदूवादी तरुण ठाम असल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील विविध शहरात सुरू असणार्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पारनेर पोलिस अलर्ट झाले असून कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असा कोणताही मजकूर समाजवाद प्रसारित करू नये, असे आवाहन पारनेर पोलिसांनी केले. सामाजिक सलोख्याला बाधा येईल कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असा कोणताही मजकूर समाज माध्यमावर प्रसारित करू नये तसे आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनीकडून देण्यात आला आहे.