नाऊरमध्ये व्यावसायिकांची रॅपिड टेस्ट ; 5 करोनाबाधित

नाऊरमध्ये व्यावसायिकांची रॅपिड टेस्ट ; 5 करोनाबाधित

नाऊर ( वार्ताहर) - श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत येथील प्रत्येक दुकानदार, व्यावसायिक यांची करोना रॅपिड टेस्ट करण्यात आली. यावेळी जवळपास 42 जणांची तपासणी करण्यात येवून त्यात 5 जण बाधित आढळले.

याप्रसंगी तहसीलदार प्रशांत पाटील म्हणाले, आपल्या कुंटूबाची व आपल्यासह गावाच्या आरोग्याची काळजी आपणच घेण्याची गरज असून राज्यात करोना काळात आदर्श ठरलेले हिवरे बाजारचा आदर्श समोर ठेवून श्रीरामपूर तालुक्यातील प्रत्येक गावाने करोनाला आपल्या वेशीच्या बाहेर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगून प्रत्येक गावाने व्यापारी वर्ग, व्यावसायिक यांची तपासणी करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

याप्रसंगी आश्रमाचे महंत स्वामी चैतन्यानंद भारती, नाऊरचे सरपंच सोन्याबापू शिंदे, जाफराबादचे सरपंच संदिप शेलार, रामपुरचे सरपंच सुरेश भडांगे, नाऊर आरोग्य उपकेंद्राचे डॉ. प्रतिक ब्राम्हणे, कामगार तलाठी ए. जे. तेलतुंबडे, चंद्रकांत गहिरे, हरिश्‍चंद्र गुंड, पत्रकार संदीप जगताप आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com